Saturday, 23 July 2011

नवलाई


नवलाई

चैतन्याची चैत्र् पहाट घेऊन आली नवलाई
इतुकी सुंदर मज सखी कधी या आधी ना दिसलेली

तव नयनातून झरझरणारा अश्रू केवढा कळवळतो
तुझ्या डोळी राहण्यासाठी तो माझ्या परि तडफडतो
तू मला दिलेला गुलाब अजुनी माझ्यापाशी आहे
तो लाल राहावा म्हणूनी माझे रक्त वाहतो आहे
सखे एकदा माझ्यासाठी उघड पापणी मिटलेली
इतुकी सुंदर मज सखी कधी या आधी ना दिसलेली

गालांवरती तिच्या तरारे चंद्र, तारका अन नक्षत्रही
गगनापेक्षा धरती वरती प्रेम ओसंडूनी वाही
कुणास ठाऊक आज का बरे पूर्ण नव्याने दिसताहे
मजला काही जुनेच अजुनी क्षणोक्षणी स्मरते आहे
शरीर थंड अन हृदय बंद सखी शांत निजलेली
इतुकी सुंदर मज सखी कधी या आधी ना दिसलेली

                            प्रणव कानिटकर 

No comments:

Post a Comment