प्रभात
अस्तरांनी नटलेली, शतपावलीची वाट
मृत्तीकेला बिलगला, तो वटवृक्षाचा थाट
सूर्यपिता धरेवरी, प्रकाशाचे अर्घ्य देई
त्या मोहक वाटेवरी, सदन भूपाळी गाई
वटवृक्षाची घेतली, भेट रविकिरणांनी
शिरले काही त्यातले, सदनी गवाक्षातुनी
लवना ती निजलेली, भुवई ती उडलेली
पापणी ती मिटलेली, रोज दिसे नटलेली
एक मोठा कवडसा, तिच्या गालावरी मग्न
पैजणांची लखलख, आणि सोनसळी अंग
उधळतो निसर्ग हा, दररोजी त्याचे रंग
चिकटले माझे पाय, नाट्य पाहण्यात दंग प्रणव कानिटकर
No comments:
Post a Comment