गंध
मेघ गर्जले, वीज पेटली, पाऊस बरसत आला
पुन्हा एकदा, भिजली माती, गंध नवा मोहरला
सळसळ सळसळ, उधळीत सुमने, सुसाट वारा आला
पानोपानी, दारोदारी, गंध पसरला गेला
दूर नभाच्या, झाडावरती, भ्रमरसखा बसलेला
पानफुलांच्या, लावाजम्यांचा, गंध हुंगला गेला
बंध रेशमी, तारुण्याचे, मनात उमटत गेले
गंध गुलाबी, वात्सल्याचे, क्षणात उमजत गेले
परती मागे, कैक परतल्या, संकोचांच्या लाटा
रेशीम नाती, जुळून आली, स्मरल्या गंधित वाटा
आताशा त्या, गंधालाही, मनात केले बद्ध
आठवणीतच, गंध राहावा, असे म्हणे प्रारब्ध
प्रणव कानिटकर
No comments:
Post a Comment