उजेड
लाटांवरती, लाटा जाती, किती जाहल्या, कुणा कळे
दु;खावरती, सुखे जळाली, असे भोगणे, कुणा टळे
किती आपुले, अंतर आहे, गगनालाही, प्रश्न पडे
आम्हा जवळी, नसतानाही, ‘अंतर’ देणे, सदा घडे
शब्दालाही, किंमत होती, ‘अर्थालाही’, अर्थ खरा
शब्द विकावा, ‘अर्थासाठी’, इतुका स्वार्थ, नव्हे बरा
भूतकाळाच्या, ‘पानांवरती’, खाडाखोडी, ना जमते
‘पाने’ पुसली, संस्कारांची, तोंड रंगले, बघ थुकते
त्यास बोलणे, ना जमते रे, तरी ना अडते, जरी ‘मुका’
चार सुखांना, मुकला तरीही, तोही घेऊ शके मुका’
भविष्याच्या, उंबरठ्यावर, उजेड पडतो, कष्टाचा
आजकालचे, खोटे जगणे, उजेड दावील, उद्याचा
प्रणव कानिटकर
No comments:
Post a Comment